Monday, May 14, 2007

आणखी पुणेरी पाट्या

. टेलिफोन बूथवरील सूचना : फोन न लागल्यास कृपया कॉइन्स परत करावीत.
२. इमारतीतल्या पार्किंगमधली पाटी : इतरांनी वाहने लावू नयेत. लावल्यास हवा सोडून दिली जाईल.
३. फाटकावरची पाटी : बिवेअर ऑफ फेरोशियस डॉग्ज अँड घोस्ट्स कुत्र्या आणि भुतांपासून सावध राहा.
४. येथे चोरी करणारा पकडला जातो. चोराने हे लक्षात ठेवावे.
५. हॉटेलवरची पाटी : आजचे ताजे पदार्थ- भजी, मिसळ मूळव्याधीचे औषध मिळेल.
६. थिएटरमधली पाटी : फुंके (सिगारेट), थुंके (तंबाखू) आणि शिंके (तपकीर) यांना रंगमंदिरात मज्जाव
७. चांदबिबी हॉटेल - दारू विक्री केली जात नाही. दारू पिऊ दिली जात नाही. दारू पिऊन आल्यास जेवण नाही

No comments: