Tuesday, March 27, 2007

हसा

बंडू बावळे सुखनिदेत निमग्न होता. अचानक बिछान्यावर प्रकाश पसरल्यानं दचकून तो जागा झाला. पाहतो तो रेड्यावर स्वार झालेले यमराज बेडरूममध्ये उभे. भयानं त्याची बोबडीच वळली. प्रसन्न हसून यमराज म्हणाले, ''घाबरू नकोस बंडू. मी तुला गुड न्यूज द्यायला आलो आहे. आणखी २० वषेर् तू ठणठणीत राहणार आहेस. मृत्यू तुझ्या केसालाही स्पर्श करणार नाही. अरे झोपलायस काय इथे? जा, बाहेर जा. मजा कर. ही आनंदाची बातमी मस्तपैकी सेलिब्रेट कर.''
यमराज अदृश्य झाले. बंडूनं तात्काळ कपडे बदलून बाहेर धाव घेतली. आनंदानं वेडा होऊन तो रस्त्यातून नाचतच चालला असताना एक ट्रक सुसाट वेगानं आला आणि बंडूला चिरडून गेला... ...
स्वर्गनरकाच्या प्रवेशद्वारावर यमराजाशी गाठ पडताच बंडूनं कळवळून विचारलं, ''का खोटं बोललात माझ्याशी? का?''
यमराज ओशाळून म्हणाले, ''सॉरी यार! मंथ एन्डचं प्रेशर असतं... काही करून टागेर्ट पूर्ण करायचं असतं!!!!''


*****************************************************************************************
एन्जॉय एसेमेसिंग

ते पाणीदार डोळे...
तो देखणा चेहरा...
ते प्रसन्न हास्य...
तो चालण्याचा उत्साही झपाटा...
ते आनंदी, सुहास्यवदन संभाषण...
ते चुंबकाप्रमाणे आकषिर्त करून घेणारं व्यक्तिमत्त्व...
... मी अजूनही तसाच आहे...
तू कसा आहेस?!!!
***************************

एका विद्यार्थ्याने एका वेळी एका परीक्षेचा एक पेपर देण्यासाठी जेवढा कागद वापरला जातो, तेवढा तयार करण्यासाठी दोन झाडांचा बळी जातो...
... झाडे वाचवण्याच्या सत्कार्यात सहभागी व्हा...
... चांगले विद्यार्थी बना आणि परीक्षांवर बहिष्कार घाला!!!
***************************
एक मग दुसऱ्या मगाला भेटला
तेव्हा काय म्हणाला?
काय मग, कसं काय?!!!

**********************************************************************************
अहो, ऐकलंत का?
लग्नंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात, त्यांत कसा बदल होत जातो, पाहा!
पहिले वर्ष : अहो!
दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?
तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा! चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?
पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?
सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?
सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!
**********************************************************************************
वो कौन सी घडी थी
जब आप पैदा हुए
टायमेक्स
रोलेक्स
टायटन
एचएमटी
क्वार्ट्झ
या कोई और?...
जल्दी जवाब दो
कंपनी बंद करनी है
ता कि ऐसा हादसा दुबारा ना हो!!!!

**********************************************************************************

आयुष्याने उभ्या केलेल्या प्रश्ानंची काही उत्तरे सापडली आहेत, या विचाराने
जेव्हा तुम्हाला हायसे वाटते...
तेव्हाच नेमके आयुष्य प्रश्ान् बदलते.

**********************************************************************************
प्र. : पुण्याच्या हॉटेलात हाफ चिकन मागवल्यावर ते यायला खूप वेळ का लागतो?
उ. : कारण, हॉटेलवाले हाफ चिकनची दुसरी ऑर्डर आल्याशिवाय कोंबडीला हातच लावत नाहीत!!!!
***********************************************************************************
एका देवदूतानं एकदा देवाला विचारलं, ''तुझ्या लाडक्या मनुष्यजातीच्या कोणत्या वृत्तीबद्दल तुला सर्वात जास्त आश्चर्य वाटतं?''
देव म्हणाला, ''अरे ही माणसं तारुण्यात पैसा कमावण्यासाठी स्वत:चं आरोग्य गमावतात आणि वार्धक्यात आरोग्य राखण्यासाठी पैसा गमावतात!!!!''
**********************************************************************************
'' बाबा बाबा, तुमच्यामुळे माझं लग्न होत नाहीये,'' खट्टू झालेला रितेश विलासरावांना संतापून म्हणाला. '' माझ्यामुळे? ते कसं काय?'' विलासरावांनी विचारलं. रितेश म्हणाला, ''अहो तुमच्याच पक्षानं सगळ्या राज्यभर बोर्ड लावलेत ना- 'विलासराव को बहुमत दो... बहु मत दो'!!!
***********************************************************************************

विन्या प्रधान एक्स्प्रेसवेवरून सुसाट कार चालवत होता. 'वाँव वाँव वाँव' करत मागून आलेल्या पोलिसाने विन्याला अडवला. ''ऐंशी किलोमीटरची स्पीड लिमिट आहे आणि तुम्ही १२०च्या स्पीडनी गाडी हाणताय? चला, लायसन काढा.'' \

विन्या म्हणाला, ''लायसन्स नाहीये माझ्याकडे. पोलिसांनीच जप्त केलंय काल. एका सायकलवाल्याला उडवला म्हणून.'' ''

भले शाब्बास! गाडीची कागदपत्रं आहेत का?'' ''

आहेत ना आहेत. या साइडच्या कप्प्यातच आहेत. माझी गन आहे ना तिच्याखाली. पण, गनला हात लावू नका. नाहीतर तुमच्या बोटांचे ठसे उमटतील तिच्यावर आणि गोत्यात याल.''

पोलिस जरासा चपापला. ''गननी काय खूनबिन केलात की काय?'' ''

खून करायची इच्छा नव्हती हवालदारसाहेब माझी! पण, त्या बाईनं फारच झटापट केली. मग घातली गोळी तिला. मागे डिक्कीत पडलीये तिची डेड बॉडी!''

पोलिसानं गाडीची चावी काढून घेतली. वायरलेसवरून वरिष्ठांना संदेश पाठवला. व्हॅन आली. इन्स्पेक्टरसाहेबांनी विन्याला विचारलं, ''तुमच्याकडे गन आहे?'' ''

छ्या हो! माझ्यासारख्या माणसाकडे गन असेल, असं वाटतं तुम्हाला?''

साहेबानं कप्पा चेक केला. त्यात गन नव्हती. साहेब म्हणाले, ''लायसन्स बघू.''

विन्यानं तात्काळ लायसन्स आणि गाडीची कागदपत्रं काढून दाखवली.

बुचकळ्यात पडलेल्या साहेबानं डिकी उघडायला लावली. ती रिकामी. साहेब म्हणाले, ''कमाल आहे! आमचा हवालदार तर म्हणत होता की तुमच्याकडे लायसन्स नाही, गन आहे, तुम्ही एक खून केलाय, बॉडी गाडीतच आहे म्हणून!'' ''

माय गॉड!'' विन्या चित्कारला, ''आणि त्याचा असाही दावा असणार की, मी गाडी फार फास्ट चालवत होतो म्हणून त्यानं मला थांबवलं!!!!''
*************************************************************************************

टीचरनी वर्गात प्रश्ान् विचारला, ''पाच जलचरांची नावं सांगा.''
बाळ संता उत्तरला, ''फिश...'' ''
आणि इतर चार जलचर?...'' ''
फिश दा पुत्तर, फिश दी कुडी, फिश दा प्रा और फिश दी माँ!!!!''
************************************************************************************
साधूवेशातील रावण : माई भिक्षा दे!
पर्णकुटीतली स्त्री : साधू महाराज, ही घ्या भिक्षा!
रावण : माई, या रेषेच्या थोडं पुढे येऊन वाढ. मी जाम थकलोय.
(स्त्री पुढे येताच तिला उचलून घेतो आणि विकट हास्य करतो) हा हा हा, मी साधू नाही, रावण आहे.
स्त्री (तेवढेच विकट हसून) : हा हा हा! मीही सीता नाही, कामवाली आहे!!!!
************************************************************************************
थारो मेसेज आवे है
म्हारो रोम रोम मचल जावे है
अंग अंग में गुदगुदी होवे है
यो थारो एसेमेस को इफेक्ट को नी
सालो म्हारो मोबाइल व्हायब्रेसन पे होवे है!!!!
************************************************************************************
एन्जॉय एसेमेसिंग तुला माझा एसएमएस आवडला...
म्हणजे मी स्मार्ट आहे
तू माझा एसएमएस सेव्ह केलास...
तर तू हे मान्य करतोस की मी स्मार्ट आहे...
तू माझा एसएमएस फॉरवर्ड केलास...
तर तू याच सत्याचा प्रसार करतोस
तू माझा एसएमएस डिलिट केलास...
तर तू माझ्यावर जळतोस
कारण मी स्मार्ट आहे!!!!
ड्ढ ड्ढ ड्ढ ड्ढ ड्ढ
***********************************************************************************
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
*************************************************************************************