Monday, May 14, 2007

पुन्हा पुणेरी पाट्या

१. भाड्याने दिल्या जाणाऱ्या गाडीमध्ये :
विशेष सूचना : गाडीमध्ये गुटखा, गोवा खाऊन बसू नये व खाऊ नये.

२. घराच्या दाराजवळची पाटी :
श्री. अनिल अनंत राजमाचीकर व कुटुंबीय यांच्याकडे येणाऱ्यांनी कृपया सदर बेलचा वापर करावा.

३. इमारतीच्या गेटसमोर :
अरे, मी गाढव आहे, गेटासमोर लावतोय गाडी.

नो पार्किंग!
४. घरावरची पाटी :

सदरील मिळकत १००५ सदाशिव पेठ विकणे नाही.
संपर्क : चंदकांत केले (मालक)

५. समारंभस्थळावरची पाटी :
अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्श करू नये. (व्यक्तींसह)

६.नारळाच्या झाडावरची पाटी :
या नारळाच्या झाडाखाली कोणीही उभे राहू नये वा गाडी लावू नये. नारळ पडून नुकसान झाल्यास मालक जबाबदार राहणार नाही.

No comments: