Monday, May 14, 2007

पीनेवाले को.............

( दारू पिणारी माणसे नेहमी 'पिणे कसे योग्य' हे सिद्ध करू पाहतात. त्यासाठी बहाणे शोधतात. काही मान्यवरांचे हे बहाणे आणि मद्यपानाबद्दलचा धोक्याचा इशारा)

'' कधीकधी मी किती प्रचंड वाइन पितो, या विचारानं मला शरम वाटते. मग मी ग्लासात डोकावतो आणि व्हिनयार्ड्समधल्या कामगारांचा, त्यांच्या स्वप्नांचा विचार करतो. मी ही वाइन प्यायलो नाही, तर त्यांना कामावरून काढले जाईल आणि त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊन जाईल. मग मी स्वत:ला सांगतो, मी ही वाइन पिऊन त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यास साह्य करणे हे माझ्या लिव्हरची काळजी करण्यासारख्या स्वाथीर् विचारापेक्षा कितीतरी चांगले आहे.

- जॅक हँडी

धोक्याचा इशारा : दारू प्यायल्यानंतर आपण खूप ताकदवान, स्मार्ट, चपळ आणि देखणे असल्यासारखे वाटू लागते. प्रत्यक्षात तुम्ही एखाद्या सुजलेल्या भोपळ्यासारखे सुजट, आणि अनिल धवनइतके मठ्ठ दिसता आणि स्वत:च्या पायावर सरळ उभे राहण्याइतकीही ताकद तुमच्यात नसते.

No comments: