Monday, May 14, 2007

शब्द पुणेरी, अर्थ पुणेरी

मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी

१.यंत्रणा : जाडजूड मुलगी

२.दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या

३.पेटणे : संतापणे

४.हुकलेला : मुद्दाच न कळालेला

५.चैतन्यकांडी : सिगारेट

६.चैतन्यचूर्ण : तंबाखू

७.चेपणे : पोट भरून दाबून जेवणे

बॅटरी : चष्मेवाला/ली
डब्बल बॅटरी : जाड भिंगांच्या चष्मेवाला/ली
डोळस : बॅटरी
पुडी : तंबाखू, गुटखा
पुडी सोडणे : थाप मारणे
खंबा : दारूची/बीयरची फुल बॉटल
पेताड : बेवडा
डोलकर : दारू पिऊन डोलणारा
सावरकर : 'डोलकरा'ला सावरणारा
वकार युनूस : दारू पिऊन ओकाऱ्या करणारा
भागवत : इकडून तिकडून उधाऱ्या करून नड भागवणारा
सोपान : गावरान गडी
सांडला : पडला
जिवात जीव येणे : गरोदर राहणे
फणस लावणे : नस्त्या कुशंका काढणे
आज बसायचे का? : आज दारूची मैफल जमवायची का?



८.कल्ला : धम्माल

९.बुंगाट : (वाहनासंदर्भात) अतिशय वेगाने

१०.गाडी : टू व्हीलर

११.टांगा पल्टी, घोडे फरार : दारू पिऊन आउट होणे

१२.थुक्का लावणे : फसवणे

१३.एलएलटीटी : लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो (तिरळा)

१४.कर्नल थापा : थापाड्या माणूस

१५.सत्संग : ओली पार्टी

No comments: