Sunday, May 27, 2007

२०१९ सालचा क्रिकेट र्वल्ड कप वृत्तांत

आशिया पॅसिफिक विभागातला अफगाणिस्तानबरोबरचा पात्रता फेरीतला सामना भारताने गमावला. पण, कोच सेहवाग निश्चिंत आहेत. ते म्हणतात की कप्तान तेंडुलकर आणि निवड समिती त्यांच्या पाठिशी भक्कम आहे. आणि दोनच वर्षांपूर्वी भारताने पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवलेला असल्याने संघाचे मनोधैर्य उंचावले आहे.

न्यूझीलंड संघाचे कोच दविड म्हणाले की आतातरी तेंडुलकरने निवृत्त होऊन आपल्या मुलाला खेळण्याची संधी द्यायला हवी. महेंदसिंग ढोणीने सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा अजित आगरकरचा विक्रम मोडीत काढला आहे. बॉलिवुडमधील प्रख्यात अभिनेता ब्रेट ली याने ढोणीला अभिनयाकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान राहुल गांधी यांनी भारतीय क्रिकेटला गतेर्तून बाहेर काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, मोहम्मद कैफ, कुंबळे या माजी क्रिकेटपटूंना पुन्हा बोलावण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. आपल्याला 'माजी' खेळाडूंमध्ये गणल्याबद्दल लक्ष्मणने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ''माझ्या क्षेत्ररक्षणात झालेली सुधारणा लक्षात घेता २०२३ सालचा ब्राझीलमध्ये होणारा र्वल्ड कप खेळण्यासाठीही मी सज्ज आहे!!!

No comments: