Sunday, May 27, 2007

शादी डॉट कॉम

'' डॉक्टर मला दीर्घायुष्य हवं आहे. खूप खूप जगायचं आहे. मी काय करू?''
'' लग्न करा.''

'' लग्नामुळे आयुष्य वाढेल?''
'' नाही. पण, खूप खूप जगायची इच्छाही पुन्हा होणार नाही!!!''

'' डालिर्ंग, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय करायचं आपण?'' बायकोनं विचारलं.
नवरा उत्तरला, ''दोन मिनिटे उभे राहून शांतता पाळूयात!!!''

हा देव तरी असा कसा आहे, काही कळत नाही. तो इतक्या सुंदर मुली तयार करतो आणि नंतर त्यांचं 'बायको'त रूपांतर करतो!!!

तुमचे लग्न झाले असेल, तर हे वाक्य वाचू नका...
... इतर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!!

No comments: