Friday, April 20, 2007

Joke

चतुर्थ श्ाेणी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे पगार वाढवून मागितला. कामगारमंत्र्यांनी कामगारनेत्यांना विचारले, ''कशाला हवेत एवढे पैसे?''

कामगारनेते म्हणाले, ''आमच्या कर्मचाऱ्यांना लोक इज्जत देत नाहीत, नाकं मुरडतात.''

कामगारमंत्री म्हणाले, ''एवढंच ना! आपण सगळ्या पदांची नावं बदलू. कामगारांची इज्जत वाढेल.''

त्यांनी नावं बदलली

ती अशी...

माळी : लँडस्केप एक्झिक्युटिव्ह

कुत्र्यामांजरांना, घोड्यांना अन्न देणारा नोकर : पशु आहारतज्ज्ञ

मोलकरीण : कौटुंबिक स्वास्थ्य व्यवस्थापक

टायपिस्ट : छापील मजकूर अधिकारी

निरोप्या पोऱ्या : व्यावसायिक संपर्कसाधक

खिडक्या, काचा पुसणारा नोकर : पारदर्शक साधन तंत्रज्ञ

चहा, नाश्ता आणणाऱ्या पोऱ्या : खानपान पर्यवेक्षक

कचरा गोळा करणारा : सार्वजनिक स्वच्छता अधिकारी

वॉचमन : चोरीप्रतिबंधक टेहळणी अधिकारी

रिसेप्शनिस्ट : कार्यालयीन संपर्क अधिकारी

स्वयंपाकी : पाकसिद्धी अधिकारी

No comments: