Friday, April 20, 2007

वरप्रतिज्ञा

सासुरवाडी माझा देश आहे।
-सासरे आणि त्यांचे सगेसोयरे हे माझे बांधव आहेत।
बायकोवर माझे प्रेम आहे।
घरातल्या विविधतेने नटलेल्या वस्तूंवर माझा डोळा आहे।
तिचया वडिलांचा घरजावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन।
माझ्या सासू-सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेन.
अपल्या कृत्यांनी सासू-सासऱ्यांना काशीयात्रेला जाण्यास प्रेरित करीन, अशी प्रतिज्ञा मी करीत आहे।
माझी बायको व माझ्या मेव्हण्या यांच्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. *******************


*************************************************************************************

बायाकोलोजी

पुरुषाला एखादे काम जमत नसेल, तर स्त्री वैतागून म्हणते, 'राहू देत, मीच करीन ते स्वत:!' पुरूष आज्ञेचं पालन करतो आणि ते काम थांबवतो। या आज्ञापालनानंतर स्त्री मात्र जामच भडकते. आपण तिचं ऐकलं, तरी ती का भडकलीये, हे पुरुषाला कळतच नाही. तो तिला विचारतो, 'अगं राणी, भडकायला काय झालं एवढं?'' तेव्हा तिचं उत्तर काय, तर, ''तुला नाही ना कळलं, मग मी तुला सांगणारच नाही!!!!''

No comments: