Friday, April 20, 2007

अमेरिका... अमेरिका!

अमेरिका... अमेरिका!

१.इथे तुमच्या घरी अॅम्ब्युलन्सपेक्षा वेळेत पिझा पोहोचतो.
२. इथे स्केटिंगच्या स्टेडियमबाहेर अपंगांसाठी विशेष पाकिर्ंग असतं.
३. इथे औषधांच्या दुकानात सिगारेटी मिळतात, त्याही पुढच्या काऊण्टरला... औषधांसाठी मात्र फेरी मारून दुकानाच्या मागच्या काऊण्टरला जावं लागतं.
३. इथे लोक चीजने तुडंुब भरलेले दोन चीजबर्गर आणि चरबीयुक्त फ्रेंच फ्राइजच्या लार्ज साइझ पाकिटाबरोबर 'डाएट' कोकची ऑर्डर देतात.
४. इथे बँकांची दोन्ही बाजूची दारं सताड उघडी असतात आणि तिथले पेनं मात्र साखळीने बांधून ठेवलेले असतात.
५. इथे लोक महागड्या गाड्या ड्राइव्हवेमध्ये ठेवतात आणि भंगार गॅरेजमध्ये!

प्रश्न

प्रश्न : 'गाइड' चित्रपटात वहिदा रहमान एकाच साडीत का वावरली आहे, तिने साडी का बदलली नाही?
उत्तर : कारण देव आनंद तिला एका गाण्यात म्हणतो,
ओ मेरे हमराही
मेरी बाँह थामे चलना
बदले दुनिया 'सारी'
तुम ना बदलना!!!!

*************************

मित्रा,
तुझ्या एसेमेस अकाऊंटचा नंबर काय?
तुझ्या सव्हिर्स प्रोव्हायडरकडे तक्रार करायची आहे...
काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या अकाऊंटमध्ये...
तुझ्याकडे एसेमेस जातो व्यवस्थित, पण तुझ्याकडून कधीच येत नाही!!!

*************************

आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांत फरक काय?
आपण आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आत्मविश्वास...
आणि फक्त आपणच आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला अतिआत्मविश्वास!!!!

देवावर श्ाद्धा ठेवा...

१. देवावर श्ाद्धा ठेवा...

पण, घराबाहेर पडताना लॅच-कुलूप सर्व लावा!!!

२. पृथ्वीवर जन्माला आल्याचा एक तरी फायदा आहेच...

दरवषीर् सूर्याभोवती फुकट चक्कर मारायला मिळते!!!

३. नेतृत्त्व करा, अनुयायी बना...

नाहीतर निदान रस्त्यातून बाजूला तरी व्हा!!!

४. प्रत्येक यशस्वी माणसामागे एक स्त्री असते...

आणि प्रत्येक अपयशी माणसामागे दोन असतात!!!

५. चोरी करू नका...

राजकारण्यांना स्पर्धा आवडत नाही!!!!

६. केवढं हे दुर्दैव! देश, जग, विश्व कसे चालवायचे, याचे प्रगाढ ज्ञान असलेली माणसे प्रत्यक्षात मात्र टॅक्सी चालवण्यात, केस कापण्यात बिझी असतात!!!!

अंग्रेजों के जमाने

अंग्रेजों के जमाने का जेलर संताच्या कोठडीत येऊन म्हणाला, ''संता, हा हा! उद्या पहाटे पाच वाजता तुला फाशी दिली जाईल, हा हा!

संता खो खो हसतच सुटला.

जेलर म्हणाला, ''संता, हा हा! असा वेड्यासारखा का हसतोयस?''

हसू दाबून संता म्हणाला, ''जेलरसाब! अहो, पहाटे पाचला फाशी कशी देणार तुम्ही मला? आठच्या आधी कधीच डोळा उघडत नाही माझा!!!

---------

जानी,

जिनके घर शीशे के होते हैं

वो...

वो टॉयलेट सिर्फ रातकोही जा सकते हैं!!!!

स्कॉच खरोखरच बेस्ट असते...

ती प्यायल्यावर प्रत्येक गोष्ट डबल दिसू लागते आणि पिणाऱ्याला आपण 'सिंगल'च असल्यासारखे छान वाटू लागते!!

देव महान आहे...

देव महान आहे...

तो भन्नाट वारा सोडून फाकडू पोरींचे स्कर्ट उडवतो...

आणि त्याच वाऱ्याने माती उडवून आशाळभूत पोरांचे डोळे मिटवतो!!!!

................................................................

जगातली सर्वात छोटी भयकथा

जगातला शेवटचा माणूस रात्री खोलीत एकटा असताना त्याच्या दरवाजावर ठक् ठक् झाली!!!!

...................................................................................

वसई पूवेर्च्या उर्मट रिक्षावाल्याला (द्विरूक्तीबद्दल क्षमस्व) संताने विचारले, ''एव्हरशाइन सिटीला येतोस का?''

रिक्षावाला म्हणाला, ''चाळीस रुपये होतील.''

संता म्हणाला, ''दहा रुपये देतो.''

रिक्षावाला म्हणाला, ''दहा रुपयात कोण नेईल?''

संता म्हणाला, ''मागे बस. मी नेतो!!!!''

दारूने नशा होते...

नशेने उत्साह वाढतो...

उत्साहात मेहनत वाढते...

मेहनतीने पैसा वाढतो...

पैशाने इज्जत वाढते...

म्हणजेच...

इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!!

काही कुविचार

काही कुविचार

१. यशाचा मार्ग... नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन' असतो!!

२. कर्ज मिळवायचे असेल, तर... तुम्हाला कर्जाची गरज नसण्याइतके तुम्ही मालदार आहात हे आधी कागदपत्रांनिशी सिद्ध करावे लागते!!!

३. आयुष्यात हव्याहव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी... एकतर बेकायदा असतात किंवा महागड्या असतात किंवा वजन वाढवणाऱ्या असतात!!!

४. झटपट श्ाीमंत होण्याची योजना प्रत्येकाकडे असते... ती कधीच यशस्वी होत नाही, हा भाग वेगळा!!!

५. ब्रेडच्या कोणत्या बाजूला लोणी लावावे... कोणत्याही बाजूला लावा हो! हातातून निसटून मातीत पडला, तर तो लोणी लावलेल्या बाजूवरच पडणार, हे नक्की!!!!

Joke

चतुर्थ श्ाेणी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे पगार वाढवून मागितला. कामगारमंत्र्यांनी कामगारनेत्यांना विचारले, ''कशाला हवेत एवढे पैसे?''

कामगारनेते म्हणाले, ''आमच्या कर्मचाऱ्यांना लोक इज्जत देत नाहीत, नाकं मुरडतात.''

कामगारमंत्री म्हणाले, ''एवढंच ना! आपण सगळ्या पदांची नावं बदलू. कामगारांची इज्जत वाढेल.''

त्यांनी नावं बदलली

ती अशी...

माळी : लँडस्केप एक्झिक्युटिव्ह

कुत्र्यामांजरांना, घोड्यांना अन्न देणारा नोकर : पशु आहारतज्ज्ञ

मोलकरीण : कौटुंबिक स्वास्थ्य व्यवस्थापक

टायपिस्ट : छापील मजकूर अधिकारी

निरोप्या पोऱ्या : व्यावसायिक संपर्कसाधक

खिडक्या, काचा पुसणारा नोकर : पारदर्शक साधन तंत्रज्ञ

चहा, नाश्ता आणणाऱ्या पोऱ्या : खानपान पर्यवेक्षक

कचरा गोळा करणारा : सार्वजनिक स्वच्छता अधिकारी

वॉचमन : चोरीप्रतिबंधक टेहळणी अधिकारी

रिसेप्शनिस्ट : कार्यालयीन संपर्क अधिकारी

स्वयंपाकी : पाकसिद्धी अधिकारी

वरप्रतिज्ञा

सासुरवाडी माझा देश आहे।
-सासरे आणि त्यांचे सगेसोयरे हे माझे बांधव आहेत।
बायकोवर माझे प्रेम आहे।
घरातल्या विविधतेने नटलेल्या वस्तूंवर माझा डोळा आहे।
तिचया वडिलांचा घरजावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन।
माझ्या सासू-सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेन.
अपल्या कृत्यांनी सासू-सासऱ्यांना काशीयात्रेला जाण्यास प्रेरित करीन, अशी प्रतिज्ञा मी करीत आहे।
माझी बायको व माझ्या मेव्हण्या यांच्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. *******************


*************************************************************************************

बायाकोलोजी

पुरुषाला एखादे काम जमत नसेल, तर स्त्री वैतागून म्हणते, 'राहू देत, मीच करीन ते स्वत:!' पुरूष आज्ञेचं पालन करतो आणि ते काम थांबवतो। या आज्ञापालनानंतर स्त्री मात्र जामच भडकते. आपण तिचं ऐकलं, तरी ती का भडकलीये, हे पुरुषाला कळतच नाही. तो तिला विचारतो, 'अगं राणी, भडकायला काय झालं एवढं?'' तेव्हा तिचं उत्तर काय, तर, ''तुला नाही ना कळलं, मग मी तुला सांगणारच नाही!!!!''

काही कुयोग

तुम्ही धावतपळत लवकर स्टेशनला पोहोचलात...

तर ट्रेन लेट असते...

स्टेशनला उशिरा पोहोचलात...

तर ट्रेन आणखी लेट असते!!!!

* तुमच्याकडे पेन असेल, तर कागद नसतो.

कागद असेल, तर पेन नसते.

दोन्ही असतील, तर लिहून घेण्यासारखे काहीच नसते!!!

* तुम्ही जेव्हा रोमिंगमध्ये असता...

तेव्हाच तुमच्या मोबाइलवर सर्वात जास्त राँग नंबर येतात!!!

* वारा कोणत्याही दिशेने वाहात असला, तरी सिगारेटचा धूर ती न ओढणाऱ्याच्या दिशेनेच वाहतो!!!

........................................................................

रोडसाइड रोमियो : जानेमन, ये, माझ्या हृदयात वस्तीला ये!

फाकडू पोरगी (भडकून) : सँडल काढू का?

रो. रो. : हत् वेडी! हे काय मंदिर आहे का? तशीच ये!!!!

...............................................

संताला गाढवाने लाथ मारली.

तो गाढवाला पकडण्यासाठी धावला.

गाढव गुंगारा देऊन गेले. वाटेत संताला झेब्रा दिसला. संताने त्याला मारायला सुरुवात केली आणि म्हणाला, ''साल्या, ट्रॅकसूट घालून गंडवतोस काय?''